पुणे : Ajit Pawar angry : देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. मात्र, अद्याप कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून अजितदादा यांनी संताप व्यक्त केला. रस्त्यावर कचरा टाकू नका, कोरोना अजून गेला नाही काळजी घ्या. मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. तसेच पाणी जपून वापरा आणि  सकाळी लवकर उठा निर्व्यसनी राहा, असा सल्लाही दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता परत कोरोना वाढतोय इथं पण बघा बसलेल्या भगिनींनि मास्क घातलं आहे. स्टेजवर फक्त एकाने मास्क घातला आहे, बाकी कोणीच घातला नाही. सगळे सांगतात मास्क घाला, मुख्यमंत्री म्हणतात. मी म्हणतोय,परत कोरोना येतोय ! अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. टेस्टिंग कमी आहे,लस घ्या बुस्टर डोस घ्या,राज ठाकरे सोनिया गांधी यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यावेळी कोरोना झाला. कोरोना गेलेला नाही काळजी घ्यायला हवी, असे अजित पवार म्हणाले.


पुण्यामध्ये दिवंगत चंचलाताई कोद्रे जिमनशीयमच उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पुणेकर मुंढवा कर रस्त्यावर कचरा कशाला टाकता, स्वतःच घर साफ अन् बाहेर कचरा यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका,कारण कचऱ्यामुळे गहाण होते अन रोगराई होते, असे अजितदादा म्हणाले.


आपले आरोग्य संभाळा. मैदानी खेळांनी शरीर चांगलं राहते. गेले दोन वर्षे कोरोनामुळे व्यायाम करता आला नाही. कसाही व्यायाम करुन चालत नाही, असे ते म्हणाले. तसेच उद्या वारीबाबत पण बैठक लावली आहे. सातारा पुणे सोलापूर जिल्हा इकडे सर्व ठिकाणी यंत्रणा काम करणार आहे. ज्यांना जायचे त्यांनी त्यांनी जावे असं आवाहन करतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले.