Ajit Pawar: धमक असेल तर...भर सभेत अजित पवार यांचे भाजपला चॅलेंज
MVA Sambhajinagar Sabha : धमक असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ताबडतोब भारतरत्न द्या... अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज भाजपला थेट आव्हान दिलं.
MVA Sambhajinagar Sabha : महाविकास आघाडीची (Mahavikasaaghadi) वज्रमूठ सभा संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) होत आहे. हाविकास आघाडी राज्यभर संयुक्त सभा घेणार आहे. त्याची सुरूवात आजपासून छत्रपती संभाजीनगरच्या सभेपासून झाली आहे. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा आहे. या सभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच धनुष्यबाण चिन्हाबाबत देखील भाष्य केले.
एक गट वेगळा झाला आणि त्यांना मान्यता देण्यात आली. हे शक्तीहीन सरकार असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. हे नपुंसक सरकार आहे सर्वोच्च न्यायालय म्हटलं आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
धमक असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ताबडतोब भारतरत्न द्या अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भर भाजपला थेट आव्हान दिले. छत्रपती संभाजीनगरात झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते. इतर महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपची दातखिळी बसली होती का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना थांबवले का नाही? असेही अजित पवार म्हणाले.
वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाही. राज्यातलं वातावरण चांगलं राहिलं नाही, तर कुणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही
एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली. आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? न्यायदेवतेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे. न्यायदेवता न्याय देईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही
देशात स्थिरता राहणार नाही. स्थिरता देशाला परवडणार नाही. जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होणार नाही.
महापुरुषांची बदनामी होत आहे. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का? मध्ये सावरकरांबाबत काहीतरी बोललं गेलं. पण वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितल्यानंतर ते वातावरण निवळलं. इथे गौरवयात्रा काढायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही दुटप्पी राजकारण करता. छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आलं नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही असं अजित पवार पवार म्हणाले.