नागपूर : सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वगळण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील या चारही सिंचन प्रकल्पाचा चौकशी अहवाल चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने एसीबीच्या महासंचालकांना दिले आहेत..जिगाव,लोवर पेढी,रायगढ़ बॅरेज आणि वाघाडी या सिंचन प्रकल्पाचे कंत्राट राष्ट्रवादीचे माजी विधान परिषद आमदार संदीप बाजोरिया यांच्याशी संबंधित कंपनीला देण्यात आले होते. 


अजित पवार पाटबंधारे विभागाचे मंत्री असताना चारही कंत्राट नियमांचा उल्लंघन केल्य़ाचा आरोप करत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. 


याच प्रकरणातून नाव वगळावे अशी मागणी अजित पवारांनी केली होती...मात्र एसीबी तपास करत असल्यामुळे तुमचे नाव याचिकेतून वगळता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच तुम्हाला नाव वगळण्याची घाई का झाली आहे असा सवालही खंडपीठानं केलाय.