सर्वात मोठं रहस्य उघड... Egyptian Pyramids साठी अवाढव्य दगड एवढ्या उंचीवर कसे नेले? उत्तर सापडलं

Egypt Pyramids Shocking Revelation Will Blow Your Mind: हजारो वर्षांपासून मानवाच्या कुतूहलाचा विषय असलेल्या इजिप्तमधील पिरॅमिड्ससंदर्भात नुकताच एक थक्क करुन सोडणार आणि आधीचे सर्व समज बाजूला सारणारा धक्कादायक दावा नव्या संशोधनामध्ये करण्यात आला आहे. नेमकं काय म्हटलं आहे या संशोधकांनी पाहूयात...

| Oct 04, 2024, 16:37 PM IST
1/11

pyramidsegypt

आतापर्यंत पिरॅमिड्स बांधण्यासाठी लाकडाचे तराफा किंवा ओंडके वापरुन दगड वर नेत उभारण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता यासंदर्भात आता एक फारच रंजक माहिती संशोधनातून समोर आली आहे. काय आहे संशोधकांचं म्हणणं पाहूयात...

2/11

pyramidsegypt

इजिप्तमधील पिरॅमिड्स हे कायमच औत्सुक्याचा विषय राहिले आहेत. या परॅमिड्सबद्दलचं गूढ आजही कायम असून त्यासाठीच दरवर्षी हजारोंच्या संख्येनं संशोधक इजिप्तमध्ये दाखल होतात. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)

3/11

pyramidsegypt

मानवाला आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही ही पिरॅमिड्स उभारण्यासाठी काही शे वर्ष लागतील असं म्हटलं जातं. मग त्या काळात ही पिरॅमिड्स नेमकी कशी उभारण्यात आली? हा प्रश्न अजूनही आपल्याला सोडवता आलेला नाही. मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनामध्ये आतापर्यंतच्या या पिरॅमिड्सच्या उभारणीसंदर्भातील सर्व शक्यता मागे टाकून नवीन माहिती देणारे पुरावे समोर आल्याचं दिसत आहे. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)  

4/11

pyramidsegypt

सध्या वाळंवटात असलेले हे पिरॅमिड्स चक्क पाण्याचा वापर करुन बांधण्यात आल्याचा दावा आता करण्यात आला आहे. आपण जितका विचार करतो त्यापेक्षा फार अधिक उत्तम तंत्रज्ञान वापरुन या उंच पिरॅमिड्सपैकी एक मोठं पिरॅमिड उभारण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. आतापर्यंत आपण केवळ हातोडी आणि छिन्नीच्या मदतीने हे एवढे मोठे दगडी ठोकळे तयार केल्याचं मानत होतो. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)  

5/11

pyramidsegypt

पिरॅमिड्सच्या निर्मितीसंदर्भातील हा संशोधनातून समोर आलेल्या तपशीलावर आधारित पेपर पीएलओएस वन नावाच्या जर्नलमध्ये 5 ऑगस्ट 2024 रोजी छापून आला आहे. त्यामध्ये 4500 वर्षांपूर्वीच दोडोसर येथील स्टेप पिरॅमिड हे हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीम म्हणजेच पाण्यातील ऊर्जेचा वापर करुन तयार करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहहे. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)

6/11

pyramidsegypt

पूर्वी संशोधकांचं असं मत होतं की दोडोसर येथील स्टेप पिरॅमिड बांधण्यासाठी हातोडी आणि छिन्नीच्या मदतीने तयार केलेले हे चौकोनी दगड एवढ्या वरपर्यंत रॅम्प आणि लेव्हर्स म्हणजेच लाकडी फळ्या आणि दोरखंडांच्या मदतीने उचलण्यात आले. मात्र आता नव्या संशोधनामध्ये यासाठी पाण्याचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)

7/11

pyramidsegypt

फ्रान्समधील सीईए पॅलिओटेक्निक इन्स्टीट्यूटमधील प्राध्यापक झेवियर्स लॅण्ड्र्यूओ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने केलेल्या संशोधनामध्ये त्या काळातील इजिप्तमधील लोकांनी जवळपासच्या कालव्यांमधील पाण्यातून ऊर्जा मिळवून त्या मदतीने हे दगड उचलले. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)  

8/11

pyramidsegypt

संशोधनातील दाव्यानुसार पिरॅमिड्समध्ये असलेल्या दोन पाटासारख्या भागांमध्ये पाणी सोडण्यात आलं. याच पाण्यात हे दगड सोडून ते तरंगत वर नेले जायचे, असा संशोधकांचा दावा आहे. "पूर्वीच्या काळातील इजिप्तवासियांना पाण्यातील ताकदीचा अंदाज होता. त्यांनी शेतीसाठी तसेच मोठ्या आकाराचे दगड वाहून नेण्यासाठी पाण्याचा वापर केला," असं संशोधनामध्ये म्हटलं आहे. "फेरोंच्या काळात बांधण्यात आलेल्या अवाढव्य आकाराच्या वास्तूंची रचना करण्यासाठी पाण्यातून ऊर्जा मिळवण्यात आली का यावर वेगळं संशोधन करता येईल असं आमचा अभ्यास सूचवत आहे," असं या संशोधकांचं म्हणणं आहे. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)

9/11

pyramidsegypt

स्टेप पिरॅमिड हे 2680 इसवी सनपूर्व रोजी उभारण्यात आल्याचं मानलं जातं. हे पिरॅमिड दोडोसर तिसरा या राजाच्या कालावधीत उभारण्यात आलं. मात्र ते नेमकं कसं उभारलं गेलं याबद्दल आजही वेगवेगळ्या शक्यताच व्यक्त केल्या जातात. नव्या संशोधनामध्ये या पिरॅमिड्समधील गिसर अल मुदीर हा भागा म्हणजे नियंत्रणात असलेली छोटी धरणं होती असं म्हटलं आहे. या धरणांमधील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करुन अती भव्य आकाराचे आणि वजनाचे हे दगड वरपर्यंत नेले जायचे असं संशोधकांचं म्हणणं आहे. (फाइल फोटो - सौजन्य रॉयटर्स)

10/11

pyramidsegypt

यासाठी पिरॅमिड्सच्या बाहेर पाणी वाहून आणण्यासाठी पाट खोदले असावेत असंही संशोधकांनी म्हटलं आहे. हेच पाणी पिरॅमिड्समध्ये नेऊन दगड उचलले जायचे. या पद्धतीला व्होलकॅनो पद्धत असं म्हणतात. यापूर्वी कधीही पिरॅमिड्सच्या बांधणीसाठी पाण्याचा वापर केलेल्या संदर्भ सापडत नाही. त्यामुळेच या दिशेने अधिक संशोधन करता येईल असं संशोधकांनी म्हटलं आहे. (प्रातिनिधिक फोटो - सौजन्य एपी)  

11/11

pyramidsegypt

मात्र दगड तरंगतील एवढं पाणी पिरॅमिड्समध्ये कशापद्धतीने साठवण्यात आलं आणि हे इतकं पाणी या ठिकाणी नेमकं कसं उपलब्ध करुन देण्यात आला याबद्दलचा संभ्रम कायम आहे. याच संशोधकांनी लाकडी फळ्यांच्या मदतीने हे दगड उचलण्यासाठी हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजेच पाण्याच्या मदतीने चालणाऱ्या तांत्रिक लिफ्ट तयार करण्यात आल्याची शक्यताही व्यक्त केली आहे. (प्रातिनिधिक फोटो - सौजन्य एपी)