हायकोर्टात 3 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती, 6 वी पास देखील करु शकतात अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हायकोर्टात 3 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती. जाणून घ्या सविस्तर

| Oct 04, 2024, 16:54 PM IST
1/7

हायकोर्टात भरती

अलाहाबाद उच्च न्यायालयात सहावी आणि दहावी पास ते पदवीपर्यंतच्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येत आहे. 

2/7

उच्च न्यायालय

मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने गट क आणि ड च्या विविध पदांसाठी भरती जारी केली आहे. यामध्ये 3306 पैकी गट क लिपिक पदांसाठी 1054 पदे जाहीर करण्यात आली आहेत. 

3/7

अंतिम तारीख

अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

4/7

हिंदी आणि इंग्रजी टायपिंग

स्टेनोग्राफर उमेदवार पदवीधर असावा. तसेच NIELIT(Doyek Society)द्वारे जारी केलेले CCC प्रमाणपत्र आणि 25 ते 30 शब्द प्रति मिनिट या वेगाने हिंदी आणि इंग्रजी टायपिंग येणारा असावा. 

5/7

ड्रायव्हिंग लायसन्स

त्यासोबतच चालकाने 10 वी उत्तीर्ण केलेली असावी आणि चारचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना असावा. जो तीन वर्षांपेक्षा कमी नसेल. 

6/7

दहावी पास

ट्यूबवेल ऑपरेटर कम इलेक्ट्रीशियनसाठी कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि आयटीआयमधून एक वर्षाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रोसेस सर्व्हरसाठी 10 पास असणे अनिवार्य आहे. 

7/7

इतर पदे

तर अन्य पदांसाठी चौकीदार, वॉटरमन, स्वीपर, माली कुली, भिश्ती आणि लिफ्टमैन या इतर पदांसाठी सहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.