Ajit Pawar Black Flags By BJP: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जनसन्मान यात्रेनिमित्त जुन्नरमध्ये आहेत. मात्र या ठिकाणी अजित पवारांना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या रोषाचाही सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडा दाखवल्याचा प्रकार जुन्नरमध्ये घडला आहे.


का दाखवले काळे झेंडे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केले. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलून पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो असे म्हणज आशा बुचकेंसहीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकींचं आयोजन करण्यात आलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं.


शिंदे गटाचा बहिष्कार


अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनेही बहिष्कार टाकण्यात आला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या 'जन सन्मान' यात्रेत ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' या योजनेचे नाव बदलून '''माझी लाडकी बहीण''' असं नामकरण करून प्रचार व प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात येत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्यात महायुती असतानाही आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्याने शिवसैनिकांनी नाराज होऊन आजच्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.


कसा आहे अजित पवारांचा कार्यक्रम?


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज जुन्नरमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठका पार पडणार आहेत. आंबेगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा दुपारी 1 वाजता होणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यातील निलायम गार्डन मंगल कार्यालयात हॉस्पिटॅलिटी व पर्यटन संदर्भात विविध बैठका होणार असून याच बैठकीला जाताना त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. सकाळी साडेदहा वाजता जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बस स्थानक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर 14 नंबर येथे बेनके फार्म हाऊसमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम सकाळी आकरा वाजता पार पडणार आहे. शिरूर - हवेली विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे.