NCP Former MLA Tukaram Bidkar Accident: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्धीकी यांची काल रात्री वांद्रे येथे हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. सलमान खानसोबतची जवळीक बाबा सिद्धीकी यांना महागात पडल्याचे म्हटले जात आहे. या हत्येचा त्यांच्या पक्षाशी संबंध नसला तरी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका नेत्याला अपघात झाला आहे. या अपघातात तो नेता गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काय आणि कुठे घडले हे प्रकरण? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात त जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुकाराम बिडकर यांच्यावर सध्या अकोल्यातील खासगी रुग्णालयात सुरू आहेत. 


कसा घडला अपघात?



प्राध्यापक तुकाराम बिडकर हे सकाळच्या वेळेत आपल्या निवासस्थानाकडून जठारपेठ मार्गाने निघाले.  ते अॅक्टीव्हावर होते.  अचानक त्यांच्या अॅक्टिवा गाडीला मागून येणाऱ्या एका चार चाकी वाहनाने धडक दिली. यामध्ये तुकाराम बिडकर हे जखमी झालेय.


अपघातात जखमी झालेल्या तुकाराम बिडकर यांना स्थानिक नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे.