Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने पहिल्या यादीत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे बारामतीमधून (Baramati) अजित पवारांच्या (Ajit Pawar) नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी या नावांची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुलभा खोडकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला असून यानिमित्ताने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी सुनील तटकरे यांनी आज रात्री किंवा उद्या दुसरी यादी जाहीर केली जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान पहिल्या यादीत नवाब मलिक, सना मलिक, सुनील टिंगरे आणि झिशान सिद्दिकी यांच्या नावाच उल्लेख नाही. यामुळे दुसऱ्या यादीत त्यांना स्थान मिळणार का? हे आता पाहावं लागणार आहे. 


"आमच्या मनात जे आलं ते आम्ही केलं आहे. जे काही राहिलं आहे त्याची चर्चा सुरु आहे. उद्यापर्यंत राहिलेली दुसरी यादीही जाहीर केली जाईल. कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही याचा अधिकार पक्षाला असतो. काही महिलांना, युवकांना, ज्येष्ठांना द्यावं लागतं. आपल्याला राज्य चालवायचं आहे," असं अजित पवार यावेळी म्हणाले. 


राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची संपूर्ण यादी - 


बारामती - अजित पवार
येवला - छगन भुजबळ
आंबेगाव -  दिलीप वळसे पाटील
कागल - हसन मुश्रीफ
परळी - धनंजय मुंडे
दिंडोरी - नरहरी झिरवाळ
अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन - आदिती तटकरे
अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
उदगीर - संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
वाई - मकरंद पाटील
सिन्नर - माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते
अहमदनगर शहर - संग्राम जगताप
इंदापूर - दत्तात्रय भरणे
अहमदपूर - बाबासाहेब पाटील
शहापूर - दौलत दरोडा
पिंपरी - अण्णा बनसोडे
कळवण - नितीन पवार
कोपरगाव - आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
बसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण - शेखर निकम
मावळ - सुनील शेळके
जुन्नर - अतुल बेनके
मोहोळ - यशवंत विठ्ठल माने
हडपसर - चेतन तुपे
देवळाली - सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतपुरी - हिरामण खोसकर
तुमसर - राजू कारेमोरे
पुसद इंद्रनील नाईक
अमरावती शहर - सुलभा खोडके
नवापूर - भरत गावित
पाथरी - निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा - कळवा - नजीब मुल्ला