लोकसभेच्या जागेवर दावा करणारे अजित पवार बॅकफूटवर
पुणे : लोकसभेच्या जागेवर दावा सांगणारे अजित पवार आता याबाबत बॅकफुटवर गेले आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून आगामी लोकसभेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडणूक लढवेल अशी घोषणा अजित पवार यांनी हल्ला बोल यात्रेदरम्यान केली होती. अजित पवारांच्या या भूमिकेमुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरून नवीन वादाला तोंड फुटलं होतं. आता मात्र अशा प्रकारचा वाद उपयोगाचा नसल्याची जाणीव राष्ट्रवादीला झाली आहे.