निलेश खरमरे झी मीडिया, पुणे : पुरात अडकलेल्यांच्या तात्काळ मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन लावून सूत्र हलवली. त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला. 'मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही सत्तेत असताना काम करत होतो. काम करत असताना लावरे लगेच फोन अशी माझी ही शैली होती.' 


'मात्र फोन लावत असताना आम्ही आदी कधी कॅमेरा लावला नाही. असा टोला विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.


नेमकं काय घडलं होतं?


मुख्यमंत्र्यांनी फोनवर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ काढण्याच्या सूचना केल्या. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथे शेतातील आखाड्यावर पुराचा विळखा पडला होता. 


अग्निशमन दलाने या दोन्ही ठिकाणी बोटीच्या मदतीनं बचावकार्य राबवत या चौघांची सुखरूप सुटका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना मदतीसाठी सूचना देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.


अजित पवार काय म्हणाले?


अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा खोचक टोला लगावला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात 12 तारखेला ओबीसी आरक्षणाची सुनावणी आहे. 


मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील इम्पेरियल डाटा तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जस मध्य प्रदेश सरकारचं इम्पेरियल डाटा ग्राह्य धरून जस मध्यप्रदेशात ओबीसींना आरक्षण दिलं. त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकारचं इम्पेरीयल डाटा ग्राह्य धोरण महाराष्ट्रातही ओबीसी समाजाला आरक्षण द्याव. अशी आमची मापक अपेक्षा आहे. असं मत अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 


विकास काम कोणत्याही सत्तेची असो त्या विकास कामांना फक्त विरोधाला - विरोध करायला नको असं देखील अजित पवार म्हणाले.