Ajit Pawar : अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौफ्यस्फोट केले आहेत. अजित पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना दिलेली उमेदवारी कुटुंबासाठी चुकीची होती. कुटुंबासाठी हा निर्णय चुकीचा होता. कारण पवार कुटुंबातीलच व्यक्ती हरणार आणि जिंकणार होती. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती. असं अजित पवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा? 


सुनेत्रा यांना उभ करणं कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. बारामतीतून उमेदवार देण्यासंदर्भात माझ्यावर महायुतीतून कोणताही दबाव नव्हता. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा संसदीय समितीचा होता. असं अजित पवार  म्हणाले. 


सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड


बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली. 


शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? 


राजकारणातील सर्व निर्णय माझेचं असतात. शरद पवार यांच्यासोबत जाणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी 'नो कमेंट' असं उत्तर दिलं. 1991 मध्ये माझा राजकारणात प्रवेश झाला. माझ्यानंतर येऊन फडणवीस, शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणं महत्त्वाचं असते.  कधीही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महायुतीकडून आम्ही विधानसभा लढवणार. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.