Ajit Pawar: `आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...`, Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!
Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना `लालची लोग` म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळालं.
Ajit Pawar On Alka Lamba: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची (JPC) मागणी करणं निरर्थक असल्याचं वक्तव्य एका मुलाखतीत केलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी कुस बसलली की काय? असा सवाल विचारला जात होता. त्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. शरद पवार यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
एकीकडे अजित पवार नॉट रिचेबच्या चर्चा तर दुसरीकडे शरद पवार यांचं वक्तव्य, त्यामुळे अनेक चर्चा होताना दिसत होत्या. अलका लांबा (Alka Lamba tweet) यांचं ट्विट चर्चेत असल्याने अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अलका लांबांच्या ट्विटवर अजित पवार भडकले. त्यांच्या ट्विटनं आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी (Ajit Pawar On Alka Lamba) खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले Ajit Pawar?
अलका लांबांनी केलेल्या ट्विटवर अजित पवार यांनी आक्रमक उत्तर देत, कोणी आमच्या काही म्हटलं तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. असं आम्ही कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही, जे महत्वाच्या व्यक्तीनं वक्तव्य केलं त्याच्या प्रश्नावर आम्ही उत्तर देणं आमचं कामं आहे, असं अजित पवार (Ajit Pawar On Alka Lamba) म्हणाले आहेत.
अजितदादांनी केली Gautam Adani यांची पाठराखण
अदानींच्या सोबतचा तुमचा फोटो व्हायरल झालाय, असं म्हणताच अजित पवार भडकले. अदानींसोबतचाच आहे ना.. कोणी अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा तर नाही ना.. लगेच कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करनं हे योग्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, सत्ताधारी आयोधेला आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाची श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी जाण्याचा त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकजण वेगवेळ्या देवस्थानांकडे जातात. आम्ही पण दर्शनाला जातो मात्र आम्ही कोणाला सांगत बसत नाही, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadanvis) लगावलाय.