Eknath Shinde Ayodhya Visit: जय श्रीरामच्या जयघोषात दुमदुमली 'अयोध्या'नगरी; शिंदे-फडणवीसांचं जोरदार शक्तिप्रदर्शन!

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) देखील अयोद्धेला पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्याचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Apr 09, 2023, 16:48 PM IST

Eknath Shinde devendra fadanvis Visit Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन (Shri Ram) घेण्यासाठी शनिवारी मुंबईतून रवाना झाले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) देखील अयोद्धेला पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्याचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

1/5

जय श्रीरामच्या जयघोषात अयोध्या नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.   

2/5

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील सर्व सहकारी मंत्री आणि आमदार यांच्यासह प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या रामलल्लाच्या मंदिरात महाआरती केली.

3/5

अयोध्येतील हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर महंतांची भेट घेतली. 

4/5

यावेळी शिवसेना भाजप युतीचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

5/5

शतकानुशतके चालत आलेली हिंदू मनाची आशा लवकरच पूर्ण होत आहे. अयोध्येचे राजा भगवान श्री राम यांचे भव्य मंदिर अयोध्या शहरात बांधले जात आहे. या पवित्र रामजन्मभूमी स्थळी पोहोचल्यानंतर माझे हृदय उत्साहाने भरून आलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.