Ajit Pawar: `छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही`
Ajit Pawar On Dharmaveer: स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती.
Nagpur Winter Session : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात आल्याने आजचा दिवस चांगलाच गाजल्याचं पहायला मिळतंय. हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) उद्या शेवटचा दिवस असतानाच आता विरोधकांनी उद्याची तयारी पुर्ण केली आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. (Ajit Pawar said in the winter session Chhatrapati Sambhaji Maharaj was not a dharmaveer)
स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार जाहीर होईल ते तरी सांगा,असं अजित पवार म्हणाले. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer) अधिवेशनात ठणकावून सांगितलं.
संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची (Hindavi Swarajya) मागणी केली. त्यामुळे काही जण जाणीवपुर्वक धर्मवीर उपाधी लावतात. मी तर नेहमी म्हणतो आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करावा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
पाहा Video -
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे लिंबू फिरवण्याची भाषा करतात, असं शिंदे नाव न घेता म्हणाले. तर मी वर्षा या शासकीय बंगल्यात गेलो तेव्हा तिकडे पाटीवर लिंबू होतं, असा दावा त्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. राज्याला एका खमक्या विरोधी पक्षनेत्याची गरज असताना आता अजित पवारांच्या भाषणाची चर्चा होताना दिसत आहे.