पुणे : Ajit Pawar said on the raid of Central Investigation Agency : राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड टाकण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar यांनी टीका केली आहे. एक पक्ष सोडून बाकीच्यांवर धाडी पडत आहेत, असे अजित पवार म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री मलिक यांच्या अटकेवर अजित पवार म्हणाले, नवाब मलिक हे प्रकरण 1993चे आहे. आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. आम्ही आमची काम करत आहोत. एक पक्ष सोडून बाकी पक्षांशी संबंधितांवर धाड पडते. सरकार येतात सरकार जातात. हे सगळं द्वेष भावनेतून वागावं हे त्यांचं त्यांनी ठरवावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मुलाखत झाली. जो पर्यंत 145 फिगर आहे. जोंपर्यंत शरद पवारसाहेब, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत ही सरकार चालणार ही काळया दगडाची रेष आहे, असा स्पष्ट इशारा दिला.


सरकार पडेल याला काही महत्व नाही !


मोदी यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. यावर अजित पवार म्हणाले, पंतप्रधान यांचा मान ठेवला पाहिजे. निदर्शनं, आंदोलन वेगळं. मात्र त्यांचा आदर केला पाहिजे. मुख्यमंत्री देखील पुण्यात यायचा प्रयत्न करतील. केंद्राने जेवढे पैसे दिले तेवढे राज्याने मेट्रोला दिले आहे, असे ते म्हणाले.


सरकार पडेल याबाबत कोण काय तारखा देतं याला काही महत्व देण्याचं कारण नाही. जोपर्यंत 145 ही मेजिक फिगर उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र आहे तोपर्यंत हे सरकार चालणार ही का दगडावरची रेघ आहे.


यावेळी राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या शिवराळ भाषेवरुन चिमटा काढला. दोघांनी तारतम्य राखून बोलावे पाहिजे. ही आपली संस्कृती नाही, असे ते म्हणाले. मराठी भाषेवर त्यांनी भाष्य केले. मराठी भाषेला आभिजात दर्जा मिळाला, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आपली भाषा बोलणारी माणसे अनेक ठिकाणी आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्यात येणार आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर त्याचे उद्घघटन होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.


आम्ही पाट्या मराठी करायच्या ठरवल्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना व्यायवसाय करण्याचं हक्क आहे. पण मराठी पाट्या लावा ना. त्या लावल्या पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.