`बारीक व्हा`, अजित पवारांनी का धरलं पोलीस अधिकाऱ्याला धारेवर?
चावीची प्रतिकृती देताना अजित पवारांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला
कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अनेक रुप बघायला मिळतात. कधी चिडताना तर कधी विनोद करतानाचे व्हिडीओ सगळ्यांनीच बघितले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामध्ये अजित पवार पोलिसांना सल्ला देताना दिसतायेत. पोलीस पेट्रोलिंग बाईक वाटप कार्यक्रमात ही घटना घडली आहे.
पवारांचा पोलिसांना नेमका सल्ला काय?
अजित पवार नेहमीच थेट मुद्द्यावर बोलताना दिसतात. तसंच काहीसं व्हिडीओत घडलेलं आहे. पोलीस पेट्रोलिंग बाईक वाटप कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. वाटप करताना एक लठ्ठ पोलीस चावी स्विकारण्यासाठी स्टेजवर आले. मात्र चावीची प्रतिकृती देताना अजित पवारांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला. बारीक व्हा बारीक... असं अजित पवार पोलिसांना म्हणाले.
कार्यक्रमानंतर पवारांनी लुटला हॉकीचा आनंद -
कार्यक्रम पार पडल्यानंतर अजित पवार यांनी हॉकी खेळण्याचा आनंद लुटला. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिग्रास हॉकी स्टेडियमचे उद्घाटन पार पडले.