किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांसह त्यांच्या सहकाऱ्यांची आज भल्या सकाळी अक्षरशः शाळा घेतली आहे. शिवाजीनगर येथील मुख्यालयातील नूतनकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या उदघाटनासाठी अजित पवारांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र अजित पवारांनी झालेल्या कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडेबोल सूनावले आहेत.


अजित पवारांचा सणसणीत टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'मला बोलवायचं असेल तर चांगली काम करा, असली छा-छु काम चालणार नाही. बारामतीला येऊन बघा कशी काम केलंयं', असा सणसणीत टोला देखील अजित पवारांनी लगावला आहे. 'गुप्ता मला अश्या कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा- छु काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?, अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुनावलं आहे. 


पोलीस कोविड व्हॅरिअर ठरलेल्यांच्या मुलांना नोकरी 


अजित पवार यांच्या हस्ते कोव्हीड काळात ज्या पोलिसांचा मृत्यू झालाय अशा तीन जणांच्या मुलांना अनुकंपानुसार तिघांना नोकरी देण्यात येत आहे. तर कोव्हीड काळात उत्कृष्ट काम केलंय अशा १७ पोलिसांचा सन्मान केला जात आहे.