दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कामकाजाला सुरुवात झालीये. कामकाजाला सुरुवात होताच सकाळीच अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुधाच्या दरावरून अजित पवारांनी सरकारचं डोकं फिरलंय का अशा शब्दात सरकारला सुनावलंय. 27 रुपये दर देऊन सरकारनं दूध संघ अडचणीचत आणलंय. 


दुधाचा दर २७ रुपये ठरवणा-याचं डोकं फिरलं आहे का? यामुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. दूध संघ संपले तर दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. दूध संघ तयार करत असलेली दुधाची पावडर परदेशात पाठवा म्हणजे दुधाची बाजारपेठ सुधारेल, अशा शब्दात पवारांनी सरकावर टीका केली. 


तसेच ,पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते, आमच्या शेतकर्‍यांना दुधालाही २० रुपये दर मिळतो. मंत्र्यांनी सांगितले होते बैठक घेऊ, कधी बैठक घेणार, दोन वर्षांपूर्वी बैठक झाली त्यानंतर बैठक झाली नाही. कर्नाटक, गोवा आणि काही राज्य दुधाला अनुदान देतात. तुम्ही ५ रुपये एक लिटर दुधाला अनुदान द्या आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरू, असेही पुढे पवार म्हणाले.