पिंपरी-चिंचवड : अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारनं अल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या घोषणेवर टीका केली आहे. शेतकऱ्यांना महिन्याला पाचशे रुपये, म्हणजे वर्षाला १६ रुपये, तेवढ्यात कात तरी मिळतो का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. आणीबाणीमध्ये तुरुंगात गेलेल्यांना १० हजार रुपये आणि शेतकऱ्यांना महिन्याला पाचशे रुपये, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, असं अजित पवार म्हणाले. आत्तापर्यंत सरकारनं गाजरं दिली, आता अर्थसंकल्पाच्या रुपानं सरकारनं आणखी मोठं गाजर दिलं आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी डान्स बार बंदी उठल्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. कसली चाय पे चर्चा, कसली मन की बात, हे सरकार दरिद्री आहे. आम्ही डान्स बार बंदी केली पण या सरकारनं डान्स बार सुरु केले. आम्ही डान्स बार बंदी टिकवली, म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. या सरकारच्या काळात अरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती मिळते, पण डान्स बारला परवानगी मिळते, असं विधान अजित पवार यांनी केलं.


आता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह


या भाषणामध्ये अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवरही भाष्य केलं. शिक्षण भरती नाही, शिक्षणाचा बाजार केलाय. अभ्यासक्रमातही मोठ्या लोकांबद्दल चुकीचा इतिहास छापल्याचं अजित पवार म्हणाले.


प्रकाश आंबेडकर यांनी तुटेपर्यंत ताणू नये. त्यांनी पुन्हा आघाडीत सहभागी व्हावं, असं आव्हान अजित पवार यांनी केलं. तसंच राज्य मंत्रिमंडळात एकही मुस्लिम किंवा माळी समाजाचा मंत्री नसल्याचंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.


पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात ७२ हत्या झाल्या. शहराची ओळख क्राईम सिटी झाली आहे. शिवसेना-भाजपचे आमदार खासदार काय करत आहेत? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. तसंच मी सत्तेत असतो, तर पुणे मेट्रो धावूनच दाखवली असती, असं म्हणत अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडकरांना हात जोडून मतदान करण्याचं आवाहन केलं. 


वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय भेजा जेल...! भुजबळांचा निशाणा