Maharashtra Politics: अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाले. यानंतर अजित पवार यांना थेट उप मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे ती अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची. अलिकडच्या काळात अजित पवार यांच्या राजकीय हालचाली पाहता ते शिंदे गट आणि भाजपवर दबाव आणण्याचा प्र.त्न करत असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर भाष्य करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक वक्तव्य केली. वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार म्हणजे भाजपसाठी युज अँड थ्रो आहेत.  अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाहीत असं स्फोटक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केले आहे. तसंच अजित पवार महायुतीमध्ये कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. 


शरद पवार गटाचे अनेक नेते सरकारसोबत येण्यास तयार; शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंचा मोठा गौप्यस्फोट


शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार गटाचे अनेक नेते सरकारसोबत येण्यास तयार आहेत. त्यांची शिंदे-फडणवीसांसोबत चर्चा सुरू असून लवकरच राज्यात राजकीय धमाका होणार असा दावा शंभूराज देसाईंनी केला आहे. यावर विरोधकांनीही निशाणा साधला आहे. तुमच्याकडे आहेत त्यांना टिकवा असा टोला पटोलेंनी लगावला आहे. तर धमाका होईलच, 16 आमदार अपात्र ठरतील असं अनिल परबांनी म्हटलं आहे.


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयातला संघर्ष आणखीन तीव्र 


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता पवार कुटुंबीयातला संघर्ष आणखीनच तीव्र होत चालला आहे. आता तर अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात खासदार सुप्रिया सुळेंनी लक्ष घालण्याचे संकेत दिले आहेत. पुण्याचे बरेच कारभारी बदलले आहेत. यामुळे मलाही पुण्यात थोडं काम करावं लागणार आहे. सर्वांप्रमाणे माझ्या आयुष्यातही संघर्ष आलाय असं म्हणत सुळेंनी पुण्यातील राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. तर ताईंनी पुण्यात लक्ष घातलं तर काही हरकत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाच्या वळसे पाटलांनी दिली आहे.