पुणे : राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. तसेच केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि केरळ सरकारला महत्वाच्या सूचना केल्या आहेत. कारण 50 टक्के रुग्णसंख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली आहे. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोविड-19चे नियम (Covid-19 rules) पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले आहे. अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पुण्यात संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच व्यवहार सुरू राहणार आहेत, हे लक्षात घ्या. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून मुलांसाठी सुविधा, उभारत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यात 50 लाख लसीकरण झाले आहे. उद्या परवा लसीकरण होणार नाही. कारण लस उपलब्ध नाही.जोपर्यंत केंद्राकडून लस पुरवठा होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरळीत होणार नाही, असे अजित पवार म्हणालेत. पुणे जिल्हा पॉझिव्हिटी रेट 6.2 वरून 6 वर आलाय. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, असे ते म्हणाले.


दोन लसी घेतल्या तरी कोरोनाचे नियम पाळावेच लागेल. मृत्युदर कमी झाला आहे. तरीदेखील लोक मास्क वापरत नाहीत. दोन्ही डोस घेऊनही कोरोना होऊ शकतो. मृत्यू देखील झाला. त्यामुळे मास्क , सॅनिटायझर (sanitisation) आवश्यक आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.


पुण्यातील दुकाने सायंकाळीच बंद करावी लागणार. 4 नंतर फेरीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर दिसतात. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देताना दिला आहे. तसेच पर्यटन स्थळे बंदच आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल. पुण्यात सध्या लागू असलेले निर्बंध यापुढेही सुरू राहतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.