Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. इथे पवार विरुद्ध पवार असा आखाडा रंगला होता. खरं तर ही निवडणूक वहिनी नंनदमध्ये झाली ज्यात नंनद सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. आता यावेळी विधानसभेत बारामतीतून कोण लढणार याचाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात रविवारी 20 ऑक्टोबरला भाजपची पहिल्या यादीत 99 उमेदवाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून न लढण्याचे संकेत देत असतानाच त्यांनी अखेर आपण कुठून उभे राहणार आहोत हे स्पष्ट केलंय.


अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाही नाही करतात करता अखेर अजित पवार बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार आहेत, हे आता स्पष्ट झालंय. येत्या सोमवारी 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या मुहूर्तावर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्तेही आग्रह दिसून आलेत. त्यामुळे आता बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मित्र पक्षप्रणित महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार हेच उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झालंय. 


लोकसभेची चूक सुधारली?


अजित पवार यांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं की, सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करुन आपण चूक केली होती. त्यानंतर अजित पवार हे आता बारामती लढणार नाहीत अशा चर्चाही रंगल्या, तसंच त्यांच्याकडूनही हे सांगण्यात आलं. मात्र काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी हे जाहीर केलं की बारामतीतून अजित पवारच ( Ajit Pawar ) लढतील. आता त्यांनी 28 ऑक्टोबरला बारामतीतून अर्ज भरणार असल्याच स्पष्ट केलंय. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पहाटेचा शपथविधी झाला अन् राजकीय भूकंप पाहायला मिळाला. पण अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत सरकार स्थापन झालं.


अडीच वर्षं सरकार चालल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि मग मुख्यमंत्री झाले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनतेनी अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. दरम्यान अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे आता स्पष्ट झालंय. सलग सात वेळा अजित पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक जिंकलेलीय. यावेळी बारामतीतील आखाड्या अधिक रंगत होणार यात शंका नाही.