औरंगाबाद : नांदेड, लातूर, औरंगाबादसह मराठवाड्यातील काही शहरात परिस्थिती गंभीर आहे, पीक वाया गेलंय, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, धरणसाठे रिकामे आहेत, मात्र सरकार अजूनही गांभीर्याने घेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती लक्षात घेत, तातडीने मराठवाड्यात बैठक घ्यावी, सचिवसह सगळे अधिकारी औरंगाबादेत बोलवावे आणि दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादेतच राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा झाला. निवडणुकांच्या तयारीच्या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला धनंजय मुंडे, अजित पवार उपस्थित होते. यावेळी निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात त्यामुळे कामाला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना केले. मराठवाड्यात राज्यात सगळीकडेच अशा पद्धतीचे युवक मेळावे घेत कार्यकर्त्यांना कामाला लागावे असे आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलंय.


सध्याचा सरकार पूर्णतः अपयशी ठरलंय प्रत्येक ठिकाणी नागरिकांना होतोय तो फक्त त्रास आणि त्रास, महागाई वाढली आहे आणि या सगळ्या परिस्थितीत हीच या सरकारला सत्तेतून खाली ओढण्याची वेळ असल्याचा सुद्धा अजित पवार म्हणाले.पक्षवाढीसाठी तुमच्या उत्पन्नातील पाच दहा टक्के पक्षाच्या उभारणीसाठी निधी द्या तुमच्या प्रगतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील वाटा आहे असेही पवार म्हणाले.
 
इतके दिवस शिवसेनेचे भाजपचे जमत नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात फाटले हे सत्तेला हापापलेले आहेत अशी टीका पवारांनी यावेळी केली, राज्यात धाक राहिला नाही पोलिसांनाच मारलं जातंय या बाबत त्यांनी खंत व्यक्त केली. यांना निवडणूका आल्या की शिवाजी महाराजांचे नाव आठवते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची करण्याच काम केलं गेलंय असा आरोप पवार यांनी केला.


आमदारांना कुणाला काय बोलावं काय हे कळत नाही. एवढी कसली मस्ती आलीय, असा टोलाही पवार यांनी लगावला.तर धनंजय मुंडे यांनी देखील सरकारवर टीका केली महागाई लोकांना अक्षरशः मेटाकुटीला आणत असल्याचा धनंजय मुंडे म्हणाले आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला खाली खेचत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार आणायचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.