बारामती, पुणे : इंदापुरातल्या (Indapur) जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची तुफान फटकेबाजी केली. पक्ष सोडून गेलेल्यांना अजित पवारांनी जोरदार कानपिचक्या लगावल्या. भाजपच्या नेत्यांवर टीका तर कार्यकर्त्यांची मेळाव्यात  अनेक विषयावर उड्वले हास्याचे फवारे  उडवत त्यांनी या मेळाव्यात वेगळाच रंग भरला. (Ajit Pawar's speech in Indapur) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा बँकेचे शाखा उद्घाटन तसेच विविध विकास कामांची उद्घाटन झाल्यानंतर शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते यावेळी त्यांनी अनेक फटकेबाजी केली.



अजित पवार हे आपल्या भाषणाच्या खासशैली सर्वाना न्यात आहे आजही त्यांनी इंदापूरात शेतकरी मेळाव्यात भाषण थांबवून पाणी मागतात व पाणी पिल्यानंतर म्हणतात हे बघा तुम्ही मला आता पाणी पिताना पाहिलं ना एका झटक्यात बाटली लावली का नाही ?  पाण्याचे बर का, असे म्हणताच एकच हशा पिकला.


अजित पवारांनी भाषण थांबवले


इंदापूरात पुणे जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री अजित पवार यांचा परत आले होते त्यांचे भाषण सुरू असतानाच राज्यात सुरू झाली आणि भाषांत थांबले इंदापूरमधील नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटनच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करताना अचानक शेजारच्या प्रार्थनास्थळ आतून आवाज कानी पडल्यानंतर अजित पवार यांनी भाषण थांबवले. 


'शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा'


मला पण ३० वर्षे राजकारणाला झालीत.. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. आताही आपण तरुणांची टीम तयार करु. तुम्ही काहीही काळजी करु नका. फक्त निर्व्यसनी राहा. चांगली कामे करा. या बोटाची थुकी त्या बोटाला लावू नका. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठेने राहा. आपण फार चांगल्या पद्धतीने काम करु, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.