अकोला : सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परतीच्या पावसामुळे शेतक-यांवर संकट आहे हे पाहाता सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. काळजीवाहू सरकारलाही काही ना काही बंधनं असतात, तरी जे निर्णय घेता येतात ते काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे राज्याचं हित पाहता लवकरात लवकर सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


सगळ्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे. राज्याच्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटामध्ये नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन होईल, अशी माझी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.


भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार का? शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी काय निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजपनं उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री अशी एकूण १६ मंत्रिपदं सेनेला देण्याची तयारी दाखवलीय, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.