Mazi Ladki Bahin Yojana : सरकारची लाडकी बहिण योजना चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पहिल्यांदाच अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकूण तीन महिन्यांचे मानधन म्हणून 4500 रुपये जमा झाले आहेत. तर अनेक महिलांना तिसरे मानधन देखील मिळाले आहे.  लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे तसेच सरकारची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत. अशातच  दोन पुरुषांनी बँक  खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे सरकारला परत केले आहेत. अकोल्यात हा प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता अकोल्यात 6 पुरुषांनी अर्ज भरले होते. यापैकी 5 पुरुष हे अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी आहेत. तर. एक हा अकोट तालुक्यातील आहे. या पुरुषांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आले होते.


हे देखील वाचा... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन


महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान सदरचा हा प्रकार उघडकीस आला होता. या सहा पुरुषांना खुलासा मागण्यात आला होता. प्रकरण अंगलट येण्याची शक्यता पाहता या सहा पुरुषांपैकी दोन पुरुषांनी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये धनादेश द्वारे राज्यसरकारला परत केले आहेत. तर चार पुरुषांनी आपण '''' लाडका भाऊ '''' योजना समजून अर्ज भरला असल्याचा खुलासा दिला आहे. तर, उर्वरित दोन पुरुषांनी अद्यापही खुलासा दिलेला नाही.


लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचं प्रकार यापूर्वी समोर आला होता. एक बँक अकाऊंट 30 वेगेवगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. खारघरमधील महिला पूजा  महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून भामट्यानं फसवणूक  केलीय.  त्याची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आलीय.. अर्ज वारंवार भरूनही दाखल होत नसल्यानं त्यांनी याची तक्रार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे केलीय.. त्यानंतर भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय...साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावे 1 नव्हे तर 30 अर्ज भरल्याचं समोर आलंय..