COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला : ऐन पावसात अकोल्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला आग लागली. या आगीत १० लाखांची रोकड जळून खाक झाली. संगणकासाठी असलेल्या सर्व्हरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलंय. बँक रोखपालांच्या कक्षाशेजारीच असलेल्या सर्व्हर रूममधील बॅटरीनेही पेट घेतल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. 


रोखपाल स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तिथून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी रोकड वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही रोकड स्वतःसोबत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सुमारे १० लाख रुपयांची रोकड या आगीत जळून खाक झाली.