SDRF Team Boat Video: अहमदनगरच्या अकोले तालुक्यात SDRF पथकाची बोट उलटून पथकातील तिघांचा मृत्यू झालाय..या घटनेचा व्हिडीओ झी 24 तासच्या हाती लागलाय...प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध SDRF पथक घेत होतं...यावेळी SDRF जवानांची बोट उलटली...आणि बोटीतील SDRF जवान पाण्यात बुडाले होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांना वाचवण्याचा इतर जवानांनी प्रयत्न केला...मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आलं..यात पथकातील 4 जणांसह 1 स्थानिक बुडालाय.


पाहा व्हिडीओ



अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही घटना घडलीय..या घटनेची माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. 


ग्रामस्थ संतापले


अकोले अहमदनगरच्या प्रवरा नदीत युवक आणि SDRF जवानांचा बुडून मृत्यूची घटनानंतर स्थानिक संतापले...स्थानिकांनी सुगावमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवला....2 जणांचा अद्यापही शोध न लागल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले...नदीतील पाण्याचा प्रवाह अद्याप का कमी केला नाही..? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी  पालकमंत्र्यांना विचारलाय...तसंच बचाव कार्य धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला..