ॲम्बुलन्सचा वापर फाइल्स नेण्यासाठी; अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार
रुग्णवाहिका ही रुग्णसेवेसाठी असते. अंबरनाथमध्ये मात्र, रुग्णवाहिकेचा वापर फाईल घेऊन जेण्यासाठी केला जात आहे.
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : ॲम्बुलन्सचा वापर रुग्णसेवेसाठी केला जातो. रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पैशांअभावी गरीब रुग्णांना ॲम्बुलन्स मिळत नाही. ग्रामीण भागात असे प्रकार अनेकदा पहायला मिळतात. अंबरनाथमध्ये मात्र, ॲम्बुलन्सचा वापर फाइल्स नेण्यासाठी केला जात आहे. अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णांना ॲम्बुलन्स मिळत नाही मात्र, फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिक संतप्त
अंबरनाथ नगरपालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीमधून कामकाज देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे काही कार्यालय शहरातील पालिकेच्या इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. अंबरनाथ नगरपालिकेची जुनी प्रशासकीय इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आता या इमारतीमधील महत्त्वपूर्ण फाईल्स सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या प्रशासकीय इमारतीमधील फाईल हलवण्यासाठी मंगळवारी वाहनाची गरज होती. मात्र पालिका प्रशासनाला इतर वाहन न मिळाल्याने चक्क ॲम्बुलन्स बोलावून त्या ॲम्बुलन्स मधून सर्व फाईल हलवण्याचे काम सुरू करण्यात आले. फाइल्स हलवण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर केल्याने नागरिक देखील चक्रावून गेले आहेत. तसेच नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे.
रुग्णवाहीका पंक्चर झाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसुती
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये आरोग्य विभागाचे वाभाळे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील महिलेला बाळंतपणासाठी बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर गरोदर महिलेला बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात आणणारी रुग्णवाहीकाच रस्त्यातच पंक्चर झाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली
रुग्णवाहिकेत डिझेल भरायला पैसे नसल्यानं, गर्भवती 1 तास पेट्रोल पंपावर अडकली
रुग्णवाहिकेत डिझेल भरायला पैसे नसल्यानं, गर्भवती 1 तास पेट्रोल पंपावर अडकल्याची धक्कादायक घटना, चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यात घडली. इथल्या धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातून या गर्भवतीला चंद्रपूरला पाठवण्यात आलं. मात्र गोंडपिपरी पेट्रोल पंपावर पैसे वेळेवर मिळत नसल्यानं, उधारीवर डिझेल टाकायला पंपचालकानं नकार दिला.