आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो `एकमेव` प्रवासी
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवारी हे कर्मचारी पावसाळी सहलीला गेले होते
रायगड : रायगडच्या आंबेनळी घाटात दाभळी टोक गावच्या हद्दीत झालेल्या मिनीबसच्या अपघातात बसमधली ३४ पैंकी ३३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. केवळ एक प्रवासी या अपघातातून सुदैवानं वाचलाय. प्रकाश सावंतदेसाई असं या प्रवाशांचं नाव आहे. हाती लागलेल्या सर्व मृतदेह आणि जखमी झालेल्या प्रकाश सावंतदेसाई यांना पोलादपूरच्या ग्रामीम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
ही बस दापोली येथून महाबळेश्वरला निघाली होती. चालकाचं नियंत्रण सुटून बस २५० ते ३०० फूट दरीत कोसळली. पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
अधिक माहिती - आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं
सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, या घटनेची केवळ माहिती समजण्यासाठी दोन-तीन तास लागले. या अपघातात गंभीर जखमी झालेले प्रकाश सावंतदेसाई कसेबसे वर आल्यानंतर अपघाताची बातमी हाती लागली. त्यामुळे मदतकार्य पोहचण्यासाठी उशीर झाला.
अधिक माहिती - आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात, ३३ जणांनी गमावला जीव (पाहा व्हिडिओ)
अपघातात गेलेले सर्व जण हे दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवारी हे कर्मचारी पावसाळी सहलीला गेले होते.