Amit Shah On Uddhav Thackrey: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली आहे. आजची सभा घेत अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातून 45 जागांवर निवडून येईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. 


काय म्हणाले Amit Shah?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार देखील केला. समान नागरी कायदा बनायला हवा की नको? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं अमित शहा म्हणाले. ट्रिपल तलाक विरुद्ध कायदा हवा होता की नाही? त्याचबरोबर राम मंदिर बनायला हवं होतं की नाही? असे सवाल अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत. मुस्लीम आरक्षण नको, असं भाजपचं मत आहे. मात्र, ठाकरे यांना काय वाटतं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.


आणखी वाचा - Sharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...


कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारला वीर सावरकरांना इतिहासाच्या पुस्तकातून मिटवायचे आहे, तुम्हाला हे मान्य आहे का? मी नांदेडच्या जनतेला विचारतो की महान देशभक्त, त्याग पुरूष वीर सावरकर यांचा सन्मान करायचा की नाही? उद्धवजी, तुम्ही दोन बोटीत पाय ठेवू शकत नाही, असंही अमित शहा म्हणाले आहेत. तुमच्या धोरणविरोधी बोलण्याला कंटाळून शिवसैनिकांनी तुमचा पक्ष सोडला, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.


राहुल गांधींवर टीका


नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानच्या घरात घुसून आतंकवादाला संपवण्याचं काम केलंय. तसेच सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन मोदींनी पाकिस्तानला जागा दाखवलीये. एकीकडे नरेंद्र मोदी देशाची मान अभिमानाने उंचावत असताना राहुल गांधी मात्र परदेशात वाईट बोलत आहेत, अशी टीका देखील त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. 9 वर्षांमध्ये विरोधकसुद्धा आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकत नाहीत, असंही अमित शहा यावेळी म्हणाले आहेत.