`मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो, बाबांनी मला...`
संभाजीनगरमधील (Sambhajinagar) एका कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सध्या राजकारणाची परिस्थिती भयावह असल्याचं अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी म्हटलं आहे.
Amit Thackeray on Maharashtra Political Crisis : सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळाची परिस्थिती पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपुर्व बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली. याच राजकीय गोंधळावर 'राज'पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीनगरमधील (Sambhajinagar) एका कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सध्या राजकारणाची परिस्थिती भयावह असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी विद्यार्थी सेनेच्या (Amit Thackeray interacts with youths) पुनर्बांधणीसाठी आलोय. मला विद्यार्थी सेनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज आहे. कॉलेज कोणत्याही पक्षाचे असो, विद्यार्थी हा मनसेचा असला पाहिजे, असं रोखठोक मत अमित ठाकरे यांनी यावेळी मांडलं.
शिक्षक मुलींसोबत गैरव्यवहार आणि फ्लर्ट करत असल्याचा प्रकार संभाजीनगर येथे समोर आला होता, त्यावर देखील अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी राजकरणासंदर्भात अतिशय वाईट मत व्यक्त करत आहेत. राजकारण (Politics) इंटरटेन्मेंट म्हणून पाहणं बंद करावं, असंही अमित ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
मी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो, बाबांनी (राज ठाकरे) मला संधी दिली. त्यांनी दिलेली संधी मी या विद्यार्थ्यांना देतोय, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. जिकडे आपली ताकत नसेल तिकडे मी स्वत: प्रचारक म्हणून फिरून काम करणार आणि प्रचार करणार, असंही 'राज'पुत्र म्हणाले.
आणखी वाचा - "...तर आदित्य ठाकरे दौऱ्यावर निघाले असते का?" अमित ठाकरे यांचा सवाल
दरम्यान, भाजप आणि 2 शिवसेना (Shiv Sena) राजकारणात आहेत. मात्र हे आव्हान नसून आपल्याला संधी आहे. याचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) आपली ताकद वाढवण्याची तयारी करत आहे. युवा वर्गात अमित ठाकरे यांचा प्रभाव प्रखरतेने दिसून येतोय, त्यामुळे मनसे येत्या काळात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.