Amol Kolhe : `27 जूनला भोपाळमध्ये काय चमत्कार घडला?`, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा
Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादा जर खाजगी बाबी बोलतील, तर मग दादांनी माझ्याशी काय खाजगी बोलणं झालं ते सगळंच आता बाहेर बोलण्याची गरज आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.
Maharashtra Politics : शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरुरमधून लोकसभेची (Shirur Loksabha) उमेदवारी मिळवण्यासाठी मंगळवारी त्यांनी पक्षांतर केल्याचं बोललं जातंय. अशातच आता पक्षप्रवेश करताच आढळराव पाटलांनी कोल्हेंवर निशाणा साधला होता. तर अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील आजची ही सभा अमोल नाही तर अनमोल आहे हे स्पष्टपणे सांगतो, असं म्हणत अजित पवारांनी कोल्हेंवर निशाणा लगावला होता. त्यावर पत्रकार परिषद घेऊन अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांवर आणि आढळराव पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
2019 मध्ये मला उमेदवारी शरद पवार यांनी दिली. ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या संघर्षाच्या काळात मी ठामपणे उभा आहे याला निष्टा म्हणतात. मंचरमध्ये झालेल्या सभेचे आश्चर्य वाटतं. अनेकांनी आज अनेक विधान केली. अजित पवार सारख्या मोठ्या नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला उमेदवार आयात करायला लागतो म्हणजे हा शरद पवार पक्षाचा विजय आहे. अजित पवार यांनी जी स्तुतीसुमने पंतप्रधान यांच्याबद्दल उधळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.
तुम्ही आमच्यावर शिक्का मारणारे कोण की आम्हाला राजकीय पिंड नाही म्हणून... अजित दादा यांनी मी केलेल्या नथुराम गोडसे यांच्या पात्र बद्दल आहे हे अजित दादा महायुतीच्या मंचावर करतील का? या संदर्भात मी आधीच भूमिका व्यक्त केली. आळंदी मध्ये जाऊन मी प्रायश्चित केलं, असं देखील कोल्हे यांनी म्हटलं आहे. शिव स्वराज्य यात्रेत कोण खाजगी मध्ये काय बोललं गेलं आहे हे बोलू का? असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.
शरद पवार यांनी मला राष्ट्रवादी कोन्ग्रेस ची संधी दिली त्यांच्याबरोबर राहणं ही माझी निष्ठा. अजितदादाचं खुप प्रेम आहे, आणि जर इतरांप्रमाणे बेडूक उडी मारली नसती तर आणि त्यांच्याबरोबर राहिलो असतो तर त्यांनी टीका केली असती का? आढळराव पाटील हे कधी माझी स्तुती करत होते तर आज काटे का पेरले जातात कारण मी एका शेतकर्यांचा मुलगा आहे म्हणून का? असं म्हणत अमोल कोल्हे यांनी बोचरा सवाल विचारला आहे.
महायुतीत अलबेल नाही, पंतप्रधान यांची लाट आता ओसरत आहे. त्यांच्या पाया खालची वाळू सरकत आहे, ते घाबरले आहे म्हणून केजरीवाल यांना अटक केली जात आहे. अजित दादा यांच्यावर चला दोस्त हो खाजगीत बोलू काही असा कार्यक्रम करावा लागेल. माझ्या सारख्या सामान्य माणसाला हरवला एवढी ताकद यांना लावावी लागते याचे आश्चर्य आहे. 27 जूनला भोपाळ मध्ये काय चमत्कार घडला की सगळाच बदललं. लोकसभा मतदारसंघातील आमदारांनी आता विचार करावा, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.