अमरावतीच्या बगाजी सागर धरणावर जीव धोक्यात टाकून पर्यटकांचे `सेल्फी फोटोसेशन`
वरुड बगाजी धरणाचे ३१ पैकी १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: धरणाच्या पाण्यात उतरून धरणासमोर पर्यटक आपला जीव धोक्यात टाकून सेल्फी फोटो सर्वास पुणे काढत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर या धरणावर पाहायला मिळत आहे. धरणावर पर्यटकांना बंदी असताना सुद्धा दररोज शेकडोच्यावर पर्यटक या धरणावर घेऊन अशाप्रकारे जीवघेणे फोटो सेशन करत असल्याचा गंभीर प्रकार सध्या सुरू आहे.
पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा झाडे उन्मळली तर कपाशी, सोयाबिनचंही नुकसान
तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने वरुड बगाजी धरणाचे ३१ पैकी १३ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणाचा विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी आलेले पर्यटकांपैकी काही हौशी पर्यटक हे चक्क धरणा समोरील पाण्यात जाऊन जीवघेणे स्टंट करून सेल्फी फोटो काढत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
१५ ऑगस्ट रोजी संचारबंदी असतांनासुद्धा हजारो पर्यटकांनी या धरणावर गर्दी केली होती. मात्र, त्यानंतर हा मुद्दा 'झी २४ तास'ने लावून धरल्यानंतर इथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. आताही तिथे पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. तरीही पर्यटक याठिकाणी येतातच कसे, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे येथे अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी केली जात आहे.