अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अनेक पात्रात पोहायला गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. दर्यापुर तालुक्यातील दोन १७ वर्षीय युवकांचा पूर्णा आणि चंद्रभागा नदीत वाहून गेल्यामुळं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोनही युवकाचा मृतदेह सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्यापुर तालुक्यातील उपराई येथील अमन विद्याधर खंडारे हा सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान गावातील चार मित्रांसोबत पूर्णा नदीवर पोहायला गेला होता. नदीपात्रात पोहण्यासाठी उडी मारताच अमन पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली. अमनचा मृतदेह नजीकच्या सोनारखेड गावाजवळ आढळून आला.


 


दुसऱ्या घटनेत नरदोळा येथील प्रथमेश विजय काळे हा युवक गावात शेजारून वाहत असलेल्या चंद्रभागा नदीवर पोहायला गेला होता. याच दरम्यान पोहता पोहता नदीपात्रात उतरला वाहून गेला या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान प्रथमेशचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टिम दाखल होत त्यांनी दुसरा मृतदेहही शोधून काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये अशा घटना सातत्यानं घडत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं तरुणाईनंही उत्साहामध्ये कोणताही निर्णय घेत असताना संभाव्य धोकाही लक्षात घेणं गरजेचं होऊन बसलं आहे.