औरंगाबाद : चिखलातील रस्त्याने एका 8 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडलीये. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी वडील मोटार सायकलवरून दवाखान्यात नेत असताना बाईक रस्त्यामध्ये झालेल्या चिखलात फसली आणि दवाखान्यात जाण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा बाबुलाल परदेशी असं या चिमुरड्याचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


सत्ता संघर्षामध्ये मविआ सरकारने जातात औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण केलं. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारनेही आधीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊन छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केले. या मोठ्या शहराचं नामकरण झालं असलं तरी शहरवासियांच्या समस्या तशाच आहे. 


लखिंपुरमध्ये राहणाऱ्या 8 वर्षीय कृष्णा परदेशी याच्या पोटात दुखू लागल्याने त्याचे वडील बाबूलाल परदेशी त्याला दुचाकीवरून गंगापूरला घेऊन जात होतं. मात्र, जाताना खराब रस्त्यावर चिखल झाल्यामुळे दुचाकी त्यात फसली. काही केल्या चिखलातून बाईक निघत नव्हती.


वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवाने चिमुरड्याने त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले. या घटनेनंतर संपूर्ण गावात यंत्रणा राजकीय नेते यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय.