प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. सध्याचे राजकारण पाहता शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करताना कुठलाही पुढारी दिसत नाही.  राजकीय पक्षात उलथा पालथ सुरु आहे. यामुळे सर्वसामान्यांचाय मनात मोठा रोष निर्माण झाला आहे. गोंदियात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळावी अशी विनंती केली आहे (Gondia News).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल ढेबे अये या तरुणाचे नाव आहे. विशाला हा जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्याच्या वडीकाळ्या गावातील रहिवासी आहे.  विशाल सध्या गोंदियात वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. विशाल याने स्वतःच्या रक्ताने राज ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात विशाल याने सर्वसामान्य नागरिक आणि सध्याची राजकीय परिस्थीती याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले आहे आहेत. 


काय आहे या पत्रात?


सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे -फडणवीस सरकार सोबत अजित पवार गटाने हात मिळवनी केली. त्यामुळे राजकारणात चालले तरी काय असा प्रश्न तरुणांना समोर उभा असून महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली आहे. राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांना कानाडोळा करून स्वतःच्या हितासाठी राजकारण करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तर, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर अपघात होऊन 25 लोकांचा जळून मृत्यू होतो तर दुसरीकडे आपले लोकप्रतिनिधी हे मंत्री पदाची शपथ घेतात. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत.  शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करीत आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.  शासन आपल्या दरबारी या योजनेतून सरकार लोकांपर्यंत योजना नेण्याच्या प्रयत्न करते पण त्यांचे प्रश्न काय आहेत हे  सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. यामुळेच विशाल याने रक्ताने पत्र लिहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती केली आहे. आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या महाराष्ट्राची धुरा आपण आपल्या खांद्यावर घ्यावी. महाराष्ट्राला एक वैभव लाभाव यासाठी फक्त राज ठाकरेचे पर्याय उरले असल्याचे विशाल याने या पत्रात म्हंटले आहे.  विशालने स्वतःच्या रक्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.