पुणे : पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकापुरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखीचं आगमन आज पुण्यनगरीत होणार आहे. प्रथेप्रमाणे नाना-भवानी पेठेत पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असेल. हा देखणा सोहळा पाहण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेशखिंड रस्ता, फग्र्युसन रस्ता, डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल. 


श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. 


संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आळंदीहून काल पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. टाळ मृदुंगाच्या गजरासह हरिनामाच्या जयघोषात अलंकानगरी दुमदुमून निघाली. दरम्यान माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी उपस्थिती लावत माऊलींचा आशिर्वाद घेतला.