नाशिक : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जर भाजपने राज्य मंत्रीमंडळात स्थान दिले तर, शिवसेना पाठिंबा काढेन. त्यातच शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला तर, भाजपप्रणीत फडणवीस सरकार कोसळेल, असे सूचक विधान केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.


'राणेंचे सुटत नसेल कोडं.. तर कुठे अडलं घोडं'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या ८८ व्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आठवले यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तसेच, आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांनी 'राणेंचे सुटत नसेल कोडं.. तर कुठे अडलं घोडं' अशी कविताही त्यांनी पत्रकारांना ऐकवली.


राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी!


दरम्यान, राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी व भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिपद द्यावे, अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली. मात्र, जर राणे यांना कोणतीच ऑफर मान्य नसेल तर, राणे यांनी थेट आपल्या रिपाइंमध्ये यावे असे निमंत्रणही दिले. 


शिवसेची सोबत हवीच


शिवसेना आणि भाजप यांच्यातील ताणलेल्या संबंधावरून पत्रकारांनी विचारले असता, महाराष्ट्रातील राजकारण मजबूत करायचे असल्यास राज्यात भाजपसोबत शिवसेना हवीच. शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रिपद द्यावे. दिल्लीतील भाजप नेत्यांमध्येही शिवसेनेला सोबत घेण्याबाबतचा मतप्रवाह असल्याचे आठवलेंनी सांगितले. शिवसेना भाजप सबंध या विषयावर भाजप नेते रामलाल यांच्यासोबत चर्चा केल्याचेही आठवले यांनी या वेळी सांगितले.