सावंतवाडी : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आंगणेवाडीची श्री भराडी देवीची यात्रा २७ जानेवारीला भरणार आहे. काही दिवसांपूर्वी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. 


प्रथेप्रमाणे काढली तारीख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित झालीय. भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. कोकणात जाणा-या गाड्यांचं तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. यात्रोत्सवाला जाणासाठी गाड्यांचं बुकिंग होतं. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणा-या यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. 


अफवांवर विश्वास ठेवू नये


दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आगणे यांनी जाहीर केले आहे.