मुंबई : महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आयपीएस वैभव निंबाळकर यांचं आसामचे महसंचालक भास्कर ज्योती महंता यांच्याकडून सत्कार करण्यात आला. आयपीएस वैभव निंबाळकर यांना मुख्यमंत्री उत्कृष्ठ सेवापदक आणि पोलीस महासंचालक प्रशंसा सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. वैभव निंबाळकर यांच्या पत्नी अनुजा निंबाळकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 जुलै रोजी आसाम आणि मिझोराम या राज्यांच्या संघर्षादरम्यान कर्तव्यावर असताना गोळीबार होऊन वैभव निंबाळकर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैभव निंबाळकर हे पुण्यात असून त्यांच्यावतीने हा पुरस्कार अनुजा वैभव यांनी स्विकारला. 



काय आहे संपूर्ण प्रकरण?


सीमा वादावरून आसाम आणि मिझोरम यांच्यातील वादाने (Assam-Mizoram Clash ) हिंसक रूप घेतले होते. आसाम-मिझोरम बॉर्डरच्या लायलापुर परिसरात आसाम पोलिसांचे 5 जवान शहीद झाले. तर cachar जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. IPS अधिकारी वैभव निंबाळकर (IPS Vaibahv Nimbalkar) यांच्या डाव्या मांडीला गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


या हिंसेत जखमी झालेले वैभव निंबाळकर मुळचे बारामतीचे असून त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. पुण्यातूनच त्यांनी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करून संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.