Padma Awards 2024 Winners : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील  उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय देशपांडे हे मल्लखांब प्रशिक्षक आहेत (uday deshpande mallakhamb). 


मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत.  त्यांनी हजारो खेळाडूंना मल्लखांबचे प्रशिक्षण दिले आहे. 50 पेक्षा अधिक देशांतील खेळाडूंनी त्यांच्याकडून मल्लखांबचे प्रशिक्षण घेतले आहे.