नागपूर : शहरात कोविडचा संसर्ग वाढता असताना जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे यादृष्टीने मनपातर्फे नवीन १६ कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या नवीन केंद्रांसह नागपूर शहरात आता कोव्हिड चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे. शहरात वाढती कोविड रुग्णांची संख्या आणि रोजचा मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी  महत्वाचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व ५०  चाचणी केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये काही ठिकाणी आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचणी केली जात आहे. अँटीजेन चाचणीचा अहवाल ३०  मिनिटांमध्ये माहित होतो. मात्र आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी कालावधी लागतो.आरटीपीसीआर  चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठीही मनपाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शहरात सध्या आरटीपीसीआर चाचणीची सहा केंद्र असून लवकरच या केंद्रांचीही संख्या वाढविली जाणार आहे. 


सध्या नागपूर शहरात दररोज साधारणत: ४००० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या वाढवून दररोज ५ हजार चाचण्या करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. नियंत्रण कक्षाचे क्रमांक कोविड चाचणी पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात बेड्‌सची उपलब्धता आहे,  हे जाणून घ्यायचे असेल तर 0712 - 2567021 या क्रमांकावर कॉल करा. कोविड-१९ संबंधीत इतर मार्गदर्शनासाठी  0712 - 2551866,  0712 - 2532474, टोल फ्री नं. 18002333764  या क्रमांकावर फोन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


<iframe allow="https://zeenews.india.com/marathi/video/shirol-ghalwad-farmers-taking-cattle-to-safe-place-to-protect-them-from-flood-situation/483844" "="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560">