मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पेनड्राईव्ह देत गौप्यस्फोट केला. त्याआधी त्यांनी पेन ड्राइव्ह देत 'व्हिडीओ बॉम्ब' टाकला होत. यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना 'डिटेक्टिव्ह' एजन्सी आहे का असा टोला लगावला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याला फडणवीस यांनी होय माजी फडणवीस ब्युरो इन्वेस्टीगेशन असल्याचं सांगत पलटवार केला होता. मात्र, आता देवेन्द्र फडणवीस यांना आणखी पदवी मिळालीय. ही पदवी त्यांना दिलीय ती भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी.


अनिल गोटे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केलीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ही तक्रार केली आहे. फडणवीस यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे, असं गोटे यांनी तक्रारीत म्हटलंय. 


यानंतर विधानभवनात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, असं कुणाचंही संभाषण कुणालाही ऐकता येत नाही. आणि ऐकलंच तरी ते असं जाहीर करताच येत नाही. मी माझ्या केससाठी वकील चव्हाण यांच्याकडे गेलो होतो. तिथे त्यांनी कॅमेरे लावले. उद्या त्यांच्या घरी कुणी कॅमेरे लावले तर चालेल का? असा सवाल त्यांनी केला.


फडणवीसांबद्दल मी पूर्वीही बोललो आहे. लबाड, कपटी, कारस्थानी, दगलबाज अशी मराठीतील जेवढी विशेषणे आहेत. ती त्यांना कमी पडतील. त्यांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं. लबाडासारखं रेकॉर्ड केलं. आवाज तोडमोड केला. हे फक्त एक गुन्हेगारच करू शकतो, अशी टीका करतानाच तो 'महा चोर' असल्याची नवी पदवी गोटे यांनी फडणवीस यांना दिलीय.