औरंगाबाद : शिवजयंती मिरवणुकीत तलवार घेऊन नाचणाऱ्या पाच टवाळखोरांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी हे टवाळखोर रॅलीमध्ये तलवार घेऊन फिरत होते आणि नाचत होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवजयंती मिरवणुकीत बुधवारी शिवाजीनगर आणि क्रांतीचौक परिसरात तलवार घेऊन नाचत असतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवजयंतीनिमित्त बुधवारी गारखेडा आणि शिवाजीनगर भागात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.


हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.