Sangli News : मोठा भाऊ उपसरपंच झाल्याच्या आनंदात लहान भावानं चक्क अख्ख्या गावाला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातली.. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीत भावाचं हे अफाट प्रेम दिसून आलं. अंकुश खिलारे असं या अवलियाचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच करगणी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली, ज्यामध्ये साहेबराव खिलारे हे निवडून आले. त्यांची गावच्या उपसरपंचपदी निवड झाली. याच आनंदात मोठा भाऊ साहेबराव खिलारेंना लहान बंधू अंकुश खिलारेनं थेट हेलिकॉप्टरमध्ये बसवत गावप्रदक्षिणा मारली.  उपसरपंच भावाला प्रदक्षिणा घालत गगनभरारी घेणा-या या लहान भावाची सांगलीसह राज्यभर चर्चा सुरु आहे. 


नवरदेवानं त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमधून नेलं


मावळमध्ये ढोणे गावात एका नवरदेवानं त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला.लग्नासाठी वाडेकर कुटूंबियांनी पुणे येथील एका कंपनीचे हेलिकॉप्टर 75  हजार रूपये प्रति तास दराने भाडेतत्वार घेतले.हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.


घरफोड्या चोरानं लढवली सरपंचपदाची निवडणूक


सत्तेसाठी कोण काय करेल सांगता येत नाही. जळगाव जिल्ह्यातल्या एका चोरट्यानं चक्क घरफोड्या करून सरपंचपदाची निवडणूक लढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पाचोरा तालुक्यातल्या बिलवाडी इथल्या प्रवीण पाटीलनं घरफोड्या करून जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. हे सर्व पैसे त्यानं सरपंचपदाच्या निवडणुकीत उधळल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. ग्रामपंचायत निवडणुकीतल्या पराभवानंतरही प्रवीण पाटलाचा रुबाब कायम होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्याबाबत संशय बळावला. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. त्यातून त्याचं बिंग फुटलं. तब्बल 20 घरफोड्या केल्याचं प्रवीण पाटलानं पोलिसांसमोर पोपटासारखं कबूल केलंय. चोरीच्या ऐवजातून खरेदी केलेली कार आणि बाईक पोलिसांनी जप्त केलीय. धक्कादायक म्हणजे कारनं नातेवाईकांकडे जात प्रवीण पाटील रेकी करायचा आणि मग घरफोडी करायचा. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी केलेली उधळणच प्रवीणला महागात पडली आणि त्याचा पर्दाफाश झाला.