Ashadi Wari : संचारबंदी घोषित; देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची वाहतूक या सात दिवशी बंद
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 4 जुलै 2021 पर्यंत संचारबंदी असणार आहे.
पिंपरी-चिंचवड : Pandharpur Ashadi Wari 2021 : देहू, आळंदी संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 4 जुलै 2021 पर्यंत संचारबंदी असणार आहे. या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद राहणार आहे. ( All traffic in Dehu, Alandi is closed for seven days) दरम्यान, देहू, आळंदी परिसरातील स्थानिक नागरिकाचे ओळखपत्र दाखवून प्रवेश खुला राहणार आहे.
कोरोनाची स्थिती वाढल्याने यंदा एसटीतून पालखी पंढरपूला रवाना होणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने केला आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.
"श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून मोफत एसटीची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी, पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला गेला. त्यानुसार गेल्या वर्षी एसटीतून पालखी सोहळा संपन्न झाला होता. त्याप्रमाणे यंदाही पालख्या (Ashadhi Palkhi Sohala) एसटीतून आणाव्यात, येणार आहेत.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातिल शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक पद्धतींनं स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे. गतवर्षीप्रमाणं पालखी सोहळा एसटीमधून आणा स्वागत करुयंदाही गत वर्षीप्रमाणे एस टी बस मधून, मोजक्या वारकऱ्यांसह प्रातिनिधीक स्वरूपात पालखी सोहळा साजरा करावा, आम्ही एसटीतून आलेल्या पालखी सोहळ्याचं स्वागत करु, असं वाखरी ग्रामस्थ म्हणाले.