मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Cognress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) आहे. मात्र, या तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि यावरुन महाविकास आघाडी सराकरमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचं बोललं जात आहे. यावरुन भाजपने (BJP) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.


3 पक्षात विसंवादाची लढाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 3 पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. 2 पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात निवडणूक केव्हाही लागू शकते असं सूचक विधान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं आहे. मावळ भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.


राज्यातलं घोटाळेबाज सरकार


राज्यात असलेला सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगेबाज असलेलं सरकार आहे. राष्ट्रवादी हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज अस हे तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून निवणुकीत यश मिळवलं. पण निवडणूक झाल्यानंतर दगाबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगेबाजच असणार आहे, अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. 


दगेबाजी करून सरकारमध्ये बसले तरी विकासासाठी मात्र काहीच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुलदैवत असलेल्या मावळमधील कार्ला एकविराचा पण साधा विकास देखील नाही. दोन वर्ष सत्ता उपभोगत असताना देखील कार्लाकडे दुर्लक्ष केलं. तर राज्याचं काय असेल..? स्वतःच्या कुलदैवतासाठी आणि आमच्या  एकविरा  तरी मुख्यमंत्र्यांनी कार्ला एकविरा गडाचा तरी विकास करावा अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.