Maharashtra Political News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुलगी लवकरच राजकारणात पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशोक चव्हाण यांना दोन जुळ्या मुली आहेत. यातील श्रीजया चव्हाण लवकरच वडील अशोक चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणार आहे. याची चर्चा नांदेडमध्ये लागलेल्या बॅनरवरुन रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची ही तिसरी पिढी आहे. (Ashok Chavan's daughter Srijaya is now in Maharashtra politics)


 बॅनरवर श्रीजयाचे फोटो झळकले आणि...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून श्रीजया चव्हाण ही राजकारणात आपले पाऊल ठेवणार असे संकेत मिळत आहे. पहिल्यांदाच भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकत आहे. यामुळे श्रीजया आता राजकारणात सक्रियपणे सहभाग होईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत अशी घोषणा होणार का, याचीही उत्सुकता आहे (अधिक वाचा ः शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, मंत्रालयात प्रवेश करताना...)


अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया 


अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत मिळत आहेत. तिला आजोबा आणि वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. आता वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत लेकही राजकारणात सक्रीय होत आहे. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्यानंतर चव्हाण कुटुंबातील आणखी एक महिला राजकारणात लवकरच सक्रिय होत आहे. अशोक चव्हाण यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. पण त्यानंतर श्रीजयाने राजकारणात पडद्याच्या मागे राहून आपल्या वडिलांची प्रचार यंत्रणा उत्तमरीत्या सांभाळली होती. तसेच अशोक चव्हाण खासदार झाल्यानंतर त्यांच्या मतदार संघात अमिता चव्हाण या आमदार झाल्यात. मात्र, त्या आता सक्रीय राजकारणापासून दूर आहेत.


चव्हाण कुटुंबीयांचा राजकीय वारसा 


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक ही सुजया चव्हाण लढविणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राजकीय वारसा चालवला. अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया दोन मुली आहेत. पत्नी अमिता चव्हाण काही काळ राजकारणात सक्रिय होत्या. आमदार ही राहील्या आहेत. सध्या त्या सक्रीय नाहीत. मात्र, चव्हाणांची तिसरी पिढी श्रीजयाच्या रुपाने राजकारणात आली येत असल्याचे चर्चा आहे.


श्रीजया चव्हाण यांचे शिक्षण 


अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया हिचे शिक्षण एलएलबी, एलएलएम झाले आहे. यापूर्वी अशोक चव्हाण यांना राजकीय वारसाबाबत अनेकवेळा विचारणा होत होती. मात्र, त्यांनी यावर थेट भाष्य केले नव्हते. आता मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त श्रीजया यांच्या राजकीय पर्वाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. नांदडे जिल्हाभर लावलेल्या बॅनरवरुन आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात येत आहे, अशी चर्चा रंगली आहे.