मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा आज निकाल (Gujarat assembly election result 2022) लागला असून भाजपने (BJP) गुजरातमध्ये एतिहासिक विजय मिळवला आहे. आता राज्यातील राजकीय (Maharashtra Politics) परिस्थिती पाहिली तर आगामी निवडणुकांसाठी आता सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्यात नवी राजकीय समीकरणं होण्याची शक्यता आहे. शिंदे गट (Shinde Group) बाहेर पडल्यानंतर आता ठाकरे गटाला एका साथीदाराची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आता महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडीचे नेते हाजी अस्लम सय्यद (Aslam Syed) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. एकीकडे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना सय्यद यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशाने प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) धक्का मानला जात आहे. 


ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले असले तरी ते प्रत्यक्षात सुद्धा महाविकास आघाडीत सहभागी होणार याबाबत संभ्रम आहे. प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्याबाबत यावर कोणत्याही नेत्याने यावर अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही.